उत्तर प्रदेश : उसाअभावी मुरादाबादमध्ये दोन साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात

मुरादाबाद : जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात २०४ लाख क्विंटल ऊस गाळप झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे २२ लाख क्विंटल कमी आहे. आता उसाअभावी चार साखर कारखाने नियोजित वेळेपूर्वी बंद होतील. कमी झालेले ऊस उत्पादन हे यामागील कारण आहे. राणा ग्रुपचे बेलवाडा आणि बिलारी साखर कारखाने मंगळवारी रात्रीपर्यंत बंद होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. तर राणी नांगल (ठाकूरद्वार) आणि अगवानपूर साखर कारखाने मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहतील.

जिल्हा ऊस अधिकारी राम किशन यांनी सांगितले की, साखर कारखाने मार्च अखेरीस बंद होत असत. परंतु यावेळी ऊस उत्पादनात घट झाल्यामुळे कारखाने वेळेपूर्वी बंद होत आहेत. मंगळवारपर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट मिळण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यांवर ऊस बिले देण्यासाठी सतत दबाव वाढवला जात आहे. लाल सड रोगामुळे ऊस उत्पादनावर परिणाम झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here