पिलीभीत : उत्तर प्रदेश सरकारने ऊस समित्या व शेतकरी सहकारी साखर कारखानदारांमधील संचालक, उपाध्यक्ष व अध्यक्षांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे येथील ऊस समित्या व साखर कारखान्यांमध्ये निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार संचालक पदांसाठीची तात्पुरती मतदार यादी २३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या यादीवरील हरकती २४ सप्टेंबरपर्यंत घेतल्या जातील. २५ सप्टेंबर रोजी मतदार यादीवरील हरकतींचे निराकरण करण्यात येईल. त्याच दिवशी अंतिम मतदार यादी प्रदर्शित केली जाणार आहे. ऊस विकास समितीचे सचिव राजेश कुमार आणि साखर कारखान्याचे जीएम डॉ. एच. के. गुप्ता यांनी सांगितले की, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
२६ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. वैध नामनिर्देशनपत्र त्याच दिवशी प्रदर्शित केली जातील. इच्छुक उमेदवारांना ३० सप्टेंबर रोजी अर्ज माघारीची अंतिम मुदत असेल. त्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. ३ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. व्यवस्थापन समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात तात्पुरती मतदार यादी ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल. यादीवरील हरकती ८ ऑक्टोबर रोजी प्राप्त होणार आहेत. त्यांचे निराकरण ९ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. त्याच दिवशी अंतिम मतदार यादी प्रदर्शित केली जाईल. १० ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल, ११ ऑक्टोबर रोजी छाननी होईल. १४ ऑक्टोबर ही अर्ज माघारीची अंतिम मुदत असेल. ३ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे.