बिजुआ : जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांपैकी सात कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू झाला आहे. यामध्ये मंगळवारी सुरू झालेल्या ऐरा, अजबापूर आणि गुलरिया या कारखान्यांचा समावेश आहे. यापूर्वी गोला, पलिया, कुंभी आणि खंभारखेडा कारखान्याचे गाळप सुरू करण्यात आले आहे. तर संपुर्णानगर आणि बेलराया हे दोन कारखाने सुरू व्हायचे आहेत. गुलरियामध्ये बलरामपूर समुहाच्या साखर कारखान्याच्या गाळप सत्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी महेंद्र बहादुर सिंह, अल्पना सिंह यांच्या उपस्थितीत झाले. उपजिल्हाधिकारी अनुराग सिंह, युनिट हेड योगेश कुमार सिंह, जिल्हा ऊस अधिकारी वेदप्रकाश सिंह, महाव्यवस्थापक तुषार अग्रवाल आदींनी गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामास प्रारंभ केला.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याला पहिल्यांदा ऊस घेवून येणारे बैलगाडी मालक, ट्रॅक्टर-ट्रॉली धारकांचा सत्कार करण्यात आला. खमरिया येथील गोविंद शुगर मिलमध्ये गळीत हंगामावेळी आमदार विनोद शंकर अवस्थी आणि कारखान्याचे कार्यकारी अध्यक्ष आलोक सक्सेना यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. उपाध्यक्ष आर. एस. ढाका यांनी सांगितले की, दर १५ दिवसांनी शेतकऱ्यांना ऊस बिले अदा केली जाणार आहेत. पगगवामधील डीसीएम श्रीराम लिमिटेड शुगर अँड डिस्टलरी युनिट अजबापूर येथे खासदार रेखा अरुण वर्मा आणि उपजिल्हाधिकारी पंकज श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत पूजा-अर्चा करण्यात आली.