उत्तर प्रदेश : आधुनिक पद्धतीने ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना मेळाव्यात मार्गदर्शन

संत कबीरनगर : खलिलाबाद ऊस विकास परिषदेंतर्गत चमरासन गावात शेतकऱ्यांना वसंत ऋतूतील ऊस लागवडीविषयी माहिती देण्यात आली. समितीचे सचिव बी. एस. दीक्षित यांनी शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने ऊस लागवडीचे आवाहन केले. बैठकीत शेतकऱ्यांना ऊस लागवडीच्या खंदक आणि रिंग पिट पद्धतीची माहिती देण्यात आली. समितीच्या सचिवांनी सांगितले की, या पद्धतीने शेती केल्याने पीक खूप चांगले येईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यावेळी शेतकऱ्यांना पाणी साचणाऱ्या शेतजमिनीत को ०११८, कोएस १३२३५, कोएस १३२३१, कोएल १५४६६, सामान्य वाण कोएस ८२७९, कोसी ८४५२ आणि यूपी ०५१२५ या ऊसाच्या प्रजातींची माहिती देण्यात आली. सचिवांनी शेतकऱ्यांना मिश्र पिकांबद्दलही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला राज्य ऊस उत्पादक पर्यवेक्षक अरविंद सिंग आणि जितेंद्र कुमार हेदेखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here