लखनौ : विधानसभा निवडणुका जवळ आल्या असल्याने उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यूपीतील शेतकरी स्थिर ऊस दर आणि थकबाकीच्या समस्येचा सामना करीत आहेत. राज्य सरकारने ऊस दरात सुधारणा करण्यासह थकबाकी गतीने मिळावी यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. आपले सरकार ऊस दरवाढीबाबत विचार करीत आहे असे त्यांनी म्हटले आहे. लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ऊस दर २८५ रुपयांवरुन वाढून २९० रुपये प्रती क्विंटल केले. त्यानंतर देशातील सर्वात मोठे ऊस उत्पादक राज्य असलेल्या यूपीमध्ये दरवाढीच्या प्रक्रियेला गती आली आहे. यूपीमध्ये गेल्या काही वर्षांपासून ऊस दरात काहीच वाढ झालेली नाही.
याशिवाय मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना गळीत हंगामापूर्वी शंभर टक्के ऊस थकबाकी दिली जाईल असेही जाहीर केले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link