उत्तर प्रदेश : उसाच्या थकीत बिलांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन, २ तास गाळप ठप्प

लखीमपुर खीरी : गोला गोकर्णनाथ येथील शेतकऱ्यांनी थकीत बिलांच्या मागणीसाठी आंदोलन केले. संतप्त शेतकऱ्यांनी उसाच्या गव्हाणीसमोर उड्या घेतल्याने दोन तास गाळप ठप्प झाले. स्थानिक साखर कारखान्याकडे ऊस विक्रीसाठी घेऊन आलेल्या अनेक शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडे थकीत बिले देण्याची मागणी केली. त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी उसाच्या गव्हाणीसमोर उडी घेतली. त्यामुळे सुमारे दोन तास गाळप थांबले.

आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. हे समजताच राष्ट्रीय किसान शक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पटेल श्रीकृष्ण वर्मा यांनी साखर कारखान्यात धाव घेतली. युनिट प्रमुखांसमोर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर साखर कारखान्याचे व्यवस्थापक राजेशकुमार मिश्रा यांनी पोलिस ठाण्यात जाऊन शेतकरी संतोष सिंग व इतरांना श्रीकृष्ण वर्मा यांच्यासमवेत पुन्हा साखर कारखान्यात आणले. पटेल श्रीकृष्ण वर्मा यांनी साखर कारखान्याच्या युनिट हेडला सांगितले की, मागील सत्राचे सुमारे ५० कोटी रुपये अद्याप थकीत आहेत आणि या सत्राचेही सुमारे २.५ कोटी रुपये आधीच थकित आहेत. त्याची विचारणा केल्यावर पोलिसांना पाचारण केले जात आहे. हा अन्याय आता शेतकरी अजिबात सहन करणार नाहीत.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here