ICRA Ratings च्या मतानुुसार येणाऱ्या हंगामात साखर उत्पादन 12 टक्यांनी वाढून 30.5 मिलियन टन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये ऊस क्षेत्र वाढल्या्यामुळे उत्पादनही वाढण्याचा अंदाज आहे. ICRA ने सांगितले की, इथेनॉल साठी ऊसाचे वाटप होवूनही साखर उत्पादन वाढेल.
गेल्या हंगामात काही जिल्ह्यांमध्ये पूर आणि काही जिल्हयांमध्ये दुष्काळामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटका मध्ये उत्पादनामध्ये घट झाली होती. या हंगामात चांगल्या हवाामानामुळे ऊसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रा मध्ये साखरेचे उत्पादन उत्पादन 64 टक्के वाढून 10.1 मिलियन टन आणि कर्नाटक मध्ये 26 टक्के वाढून जवळपास 4.3 मिलियन टन होण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेश मध्ये साखरेचे उत्पादन 3 टक्के कमी होऊन 12.3 मिलियन टन राहण्याची शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.