उत्तर प्रदेश सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूप आनंदाची बातमी दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी ऊस दरात (एसएपी) २५ रुपये प्रती क्विंटल वाढ करण्याची घोषणा केली.
या निर्णयाचा फायदा राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी संयुक्त किसान मोर्चातर्फे होणाऱ्या भारत बंदच्या कार्यक्रमापूर्वी आयोजित एका शेतकरी परिषदेत बोलताना ही माहिती दिली.
लखनौमध्ये झालेल्या शेतकरी संमेलनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, बहूजन समाज पक्षाच्या शासनकाळात २१ साखर कारखाने बंद करण्यात आले होते. तर समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात ११ कारखाने बंद केले गेले. जेव्हा आम्ही सत्तेवर आलो आहे, तेव्हापासून आम्ही बंद साखर कारखान्यांना पुन्हा सुरू केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे योगी म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link