ऊस थकबाकीबाबत उत्तर प्रदेश सरकारची कडक भूमिका; साखर कारखान्याविरोधात कारवाई

लखनौ : ऊस थकबाकीबाबत राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. १०० टक्के ऊस बिलांसाठी शेतकरी संघटना आक्रमक बनत आहेत आणि त्यांनी आंदोलने करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने बिले देण्यात पिछाडीवर असलेल्या कारखान्यांविरोधात कारवाईचे हत्यार उचलले आहे.

PTI मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहारनपूरमध्ये थकबाकी देण्यात अपयशी ठरलेल्या खासगी साखर कारखान्याची प्रशासकीय इमारत आणि गेस्ट हाऊस सील करण्यात आले. उप विभागीय न्यायदंडाधिकारी (एसडीएम) संजीव कुमार यांनी सांगितले की, Ganjnauli मधील कारखान्याकडे शेतकऱ्यांची जवळपास १९६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ते म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने बजाज हिंदुस्तान शुगर लिमिटेडच्या मालकीच्या कारखान्याला थकबाकी देण्याबाबत यापूर्वी अनेक नोटिसा जारी केल्या आहेत.

बजाज हिंदुस्तान शुगरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आले आहे आणि आम्ही प्राधान्यक्रमाने थकबाकी देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहोत. मंगळवारी जिल्हा प्रशासनाच्या पथकाने जप्तीची नोटीस घेवून कारखाना कार्यस्थळ गाठले. साइटवर कोणीच उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कार्यालय व गेस्ट हाऊस सील केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here