लखनऊ(उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेश सरकारने लॉक डाऊन दरम्यान साखर कारखान्यांसह ११ उद्योगांना काम सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. सरकारचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांनी काढलेल्या आदेशानुसार, स्टील, रिफाइनरी, सीमेंट, रसायन, साखर कारखाने आणि इतर क्षेत्राशी संबंधित उद्योगांना राज्यात काम सुरु करण्याची अनुमति दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये परिस्थितीनुसार केवळ उत्पादन प्लांट खुले होतील आणि इथेही सोशल डिस्टेंसिंग ठेवून केवळ निम्मे कर्मचारी काम करु शकतील. या प्लांटचे हेड क्वाटर्स आणि एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स यांना खुले करण्याची अनुमती दिली गेली नाही. हॉट स्पॉट झोन मध्ये येणाऱ्या कारखान्यांना ही काम सुरु करण्याची . परवानगी नाही.
कोरोना पासून वाचण्यासाठी सर्वच उद्योगकर्मींचे स्क्रिनिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात सैनिटायजर, मास्क आणि पाण्याची उपलब्धता निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच जर एखादा कर्मचारी कोविड-१९ पासून संक्रमित वाटल्यास मालकांनी ताबडतोब जिल्हा प्रशासनाला सांगावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
याशिवाय लॉक डाऊन दरम्यान सुरु असणाऱ्या प्लांटसाठी कच्चा माल आणि देखरेख अशा सुविधांसाठी परिवहन चे ही सहकार्य राहील. लॉक डाऊन 14 एप्रिलला संपणार होता, पण कोरोना फैलाव लक्षात घेता प्रधानमंत्र्यांनी सावधानी बाळगून लॉक डाऊन चा कालावधी 3 मे पर्यंत वाढवला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.