लखनऊ (उत्तरप्रदेश) : देशातील सर्वात मोठे राज्य असणारा उत्तर प्रदेश साखरेसाठी प्रसिद्ध आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) यांच्याकडून आलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या गाळप हंगामातील (29 फेब्रुवारीपर्यंत) साखर उत्पादन सर्वात जास्त आहे. इस्माच्या मतानुसार, 29 फेब्रुवारीपर्यत गेल्या हंगामाच्या तुलनेत उत्तर प्रदेशात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे. तर देशातील दुसर्याराज्यांमध्ये साखर उत्पादन कमी झाल्याचे चित्र आहे.
उत्तर प्रदेशामध्ये 29 फेब्रुवारी, 2020 पर्यंत 119 साखर कारखाने सुरु होते, ज्यांनी 76.86 लाख टन साखरेचे उत्पादन केले. गेल्या वर्षी याच कालावधीत 117 साखर कारखान्यांनी 73.87 लाख टन साखर उत्पादन घेतले होते.
देशाबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या काही महिन्यात देशभरातल्या 453 साखर कारखान्यांमध्ये साखरेचे एकूण उत्पादन 194.84 लाख टन झाले. गेल्या वर्षी याच अवधीत 520 कारखान्यांचे एकूण साखर उत्पादन 249.30 लाख टन झाले होते. देशाच्या साखर उत्पादनावर याचा परिणाम झाला, कारण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये पूर आणि दुष्काळामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.