पीलीभीत, उत्तर प्रदेश: राज्याच्या ऊस विभागाने राज्यभरात ऊस विकास समित्या, सहकारी ऊस संघ, सहकारी ऊस कारखाना भवन, जिल्हा ऊस कार्यालये, ऊस शेतकरी संस्थान भवन, ऊस उपायुक्त कार्यालये आणि ऊस संशोधन परिषद आदी सर्व कार्यालयांसाठी स्वच्छ हरित अभियान सुरु केले आहे. यूपी चे ऊस आणि साखर उद्योगाचे प्रमुख सचिव संजय आर भूसरेड्डी यांच्या नुसार, सर्व संबंधीत परिसरांना आकर्षक बनवण्यासाठी स्वच्छ केले जाईल. तसेच पेंट केले जाईल आणि वृक्षारोपणही केले जाणार आहे.
भूसरेड्डी यांनी सांगितले की, सर्व संबंधीत अधिकार्यांना कामाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी पीडब्ल्यूडी आणि सीपीडब्ल्यूडी कडून निश्चित केलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, सर्व विभागीय भवनांसाठी एक समान रंगाचा कोड निश्चित करण्यात आला आहे. ई टेंडर च्या माध्यमातून ऊस प्रशासनाकडून मिळालेल्या पेंटीगं कामांच्या दरांच्या आधारावर, हे काम एका प्रतिष्ठित पेंट निर्माण कंपनीकडे सुपुर्द करण्यात आले आहे, जे पीडब्ल्युडी आणि सीपीडब्ल्यूडी च्या निश्चित दरांपेक्षा जवळपास 36 टक्के कमी आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.