लखनऊ: उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान २५ मे अखेर २ कोटी लिटर सॅनिटायझरचे उत्पादन केले आहे. ऊस विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांनी सांगितले की, ९७ साखर कारखाने आणि छोट्या युनीटसनी उत्पादनात उच्चांक निर्माण केला आहे. कारखाने, छोट्या युनीटसची उत्पादन क्षमता ६.५ लाख लिटर आहे. मात्र, त्यांच्याकडून दररोज ६ लाख लिटरचे उत्पादन केले जात आहे. फक्त उत्तर प्रदेशच नव्हे तर इतर राज्यांना पुरवठा करण्याइतके सॅनिटायझर उत्पादन झाले आहे.
भूसरेड्डी म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांकडून उत्पादीत सॅनिटायझर ५००० गावे आणि ४००० सार्वजनिक कार्यालयांच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरले आहे. ग्रामीण भागात विषाणूची साखळी तोडण्यासाठी ऊसापासून बनविलेल्या सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. आतापर्यंत ४९५२ गावे आणि ५२७ विभाग, ४४८९ सार्वजनिक कार्यालयांत साखर कारखान्यांच्या सॅनिटायझरने सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. सहारनपूरमधील ५८५ गावे, १२८ विभाग, ३९३ सार्वजनिक कार्यालये, मेरठमधील १९४ गावे, १३९ सार्वजनिक कार्यालये, मुरादाबादमधील २२४ गावे, ३५८ सार्वजनिक कार्यालये तसेच बरेलीतील १५२ १५२ गावे, १०९ सार्वजनिक कार्यालये सॅनिटाइज करण्यात आली आहेत.