पिलिभीत : जिल्ह्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. उसासोबत इतर मिश्र पिके घेण्याबाबत शेतकऱ्यांना जागरूक केले जात आहे. त्याचा परिणाम जमिनीवर दिसून येत आहे. ऊस उत्पादक शेतकरी उसासोबत वाटाणे, पिवळी मोहरी, धने इत्यादी अनेक पिके घेऊन आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहेत. जिल्ह्यात ११,००० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात उसामध्ये आंतरपीके घेतली जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने हरभरा, मसूर, बटाटे, जवस आदींचाही समावेश आहे. ऊस विकास परिषदेच्यावतीने पंडारी आणि कटैया या गावांमध्ये मिश्र पिकांची प्रात्यक्षिके झाली. जिल्हा ऊस अधिकारी खुशीराम भार्गव व इतर अधिकारी उपस्थित होते.
हिंदूस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी भार्गव यांनी माझोला ऊस विकास परिषदेच्या पंडारी आणि कटैया गावांना भेट दिली. पंडारी गावातील शेतकरी परमिंदर सिंग यांच्या उसातील मिश्र पिकांच्या प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी केली. परमिंदर यांनी १.५३७ हेक्टरवर कोशा-१३२३५ या ऊस जातीची लागवड केली आहे. त्यामध्ये मोहरीचे सह-पीक घेतले आहे. त्यांना प्रती हेक्टर १२-१५ क्विंटल मोहरीचे उत्पादन मिळाले. कटैया येथील शेतकरी पलविंदर बहादूर सिंग यांनी एक हेक्टरमध्ये को ०११८ या उसासोबत मोहरी-गोल्डीचे मिश्र पीक घेतले आहे. कुलारा येथील शेतकरी सत्यपाल कौर यांनी एक हेक्टर क्षेत्रात वाटाणा आणि को-०११८ या जातीचा ऊस असे पीक घेतले आहे. शेतकरी उसासोबत भुईमूग, काकडी, टरबूज, कांदा इत्यादी मिश्र पिके घेऊ शकतो असे सांगण्यात आले. ऊस विकास परिषदेच्या माझोला येथील एससीडीडीआय विजय लक्ष्मी, सहकारी ऊस विकास समितीचे सचिव प्रदीप अग्निहोत्री, मंडळ प्रभारी सुशील यादव, शंकर सिंह इत्यादी उपस्थित होते.