इथेनॉल उत्पादनाला देशात गती मिळाली आहे. आणि ही गती वाढविण्यासाठी अनेक राज्यांकडून काम सुरू आहे. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश देशातील इथेनॉल उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. आज, उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठा इथेनॉल पुरवठादार देश बनला आहे.
राज्याचे ऊस मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, वर्ष २०१६-१७ मध्ये राज्यातील इथेनॉल उत्पादन ४३.२ कोटी लिटर होते. ते आता २०२०-२१ मध्ये वाढून १०७. २१ कोटी लिटर झाले आहे. त्यातून उत्तर प्रदेश इथेनॉलचे देशातील सर्वात मोठे पुरवठादार राज्य बनले आहे.
उत्तप प्रदेशात शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. खास करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहिले आहे. इथेनॉल उत्पादनातील वाढीतून ऊस उत्पादकांची बिले देण्यात गती आली आहे.