उत्तर प्रदेश : ‘ती’ साखर माकडांनी खाल्लीच नाही!, गोडाऊन किपरसह दोघांवर गुन्हा नोंद

अलीगढ:साखर कारखान्यातील ११०० क्विंटलच्या साखर घोटाळा प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. यापूर्वी सुमारे ३५ लाख रुपयांची साखर पावसात वाहून गेली आणि माकडांनी खाल्ल्याचा दावा केला जात होता.या वृत्ताने देशभरात जोरदार चर्चा रंगली.मात्र, हा दावा पोकळ ठरला, कारण हा साखर कारखाना अनेक महिन्यांपासून बंद होता.आता या साखर घोटाळ्याप्रकरणी तपास अहवालानंतर गोडावून किपरसह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माकडांनी ३० दिवसांत ३५ लाख रुपये किंमतीची ११०० क्विंटल साखर खाल्ल्याचे अहवालात दाखविण्या आले होते.लेखापरीक्षण अहवालात ही बाब समोर आली आहे.या प्रकरणात व्यवस्थापक आणि लेखा अधिकाऱ्यांसह सहा जण दोषी आढळले.त्यानंतर सरकारकडून चौकशी करण्यात आली.तपास अहवालानुसार प्रभारी गोदाम किपर आणि गोदाम किपरविरुद्ध जवां पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टोअर किपरने सांगितले की, ऑडिट टीमने गेस्ट हाऊसमध्ये बसून हवेतच ऑडिट केले आहे.जेवढे सांगितले जाते, तेवढे साखरेचे प्रमाण कमी नाही, असा दावा त्याने केला.

कारखान्यातील गोदामाचे शटर तुटले आहेत.तेथील छत तुटले आहे.छतावरून पाणी गळते.माकडांनी साखर गोदामात साखर पसरवली आहे. पावसाचे पाणी छतावरून खाली येते.त्यामुळे ५२८ क्विंटल साखर कमी आवक झाली आहे.लेखापरीक्षण पथकाकडून 1100 क्विंटल साखरेचा तूट असल्याचा अहवाल चुकीचा आहे.सुरक्षा रक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले की, येथे माकडांची दहशत असून २०२० नंतर येथे साखरेचे उत्पादन झालेले नाही.साखर कशी कमी झाली हेही त्यांना माहीत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here