उत्तर प्रदेश : ऊस बियाणे व्यवसायातून ५८ हजार महिलांच्या जीवनात पसरला गोडवा

बिजनौर : ऊस बियाण्याची नर्सरी आणि त्याच्या वितरणातून उत्तर प्रदेशमध्ये ३,००४ महिला स्वयंसाह्यता समुहांशी संलग्न ५८,००० हून अधिक महिलांच्या आर्थिक, सामाजिक उत्थानास मदत मिळत आहे. राज्याच्या साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन महिन्यांत या महिलांनी रोग प्रतिकारक ऊसाचे बियाणे विकसित करून २४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. बियाणे एकल कळी तसेच उती संवर्धन पद्धतीच्या माध्यमातून तयार करण्यात आले. त्याचा राज्यातील ऊस लागवडीत मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

कोविड महामारीच्या कठीण काळात या महिलांना योजनेंतर्गत बियाणे विकसित करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले होते. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे ऊस उत्पादक राज्य आहे. राज्यात २७ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रात ऊसाची लागवड करण्यात आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार बिजनौरमध्ये २००० महिला शेतकऱ्यांना उसाचे चांगले बियाणे विक्री करून दररोज ३०० रुपयांची कमाई करतात. ग्रामीण महिला कार्यक्रमाच्या माध्यमातून ऊस वितरण सुरू असल्याने राज्यात शेतकऱ्यांच्या आर्थिक-सामाजिक स्थितीत बदल केला जात आहे. महिलांसाठी हे क्षेत्र संधी देणारे ठरले आहे. ऊस विभागाचा उद्देश महिलांना सशक्त बनविण्याचा आणि ऊसाचे उत्पादन वाढवण्याचा आहे. सरकार या गटांना प्रत्येक ऊस यंत्रावर १.३० रुपयांचे अनुदान देते. शेतकरी लागवडीत याचा अधिक वापर करतात. कारण या रोपांची वाढ अधिक गतीने होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here