उत्तर प्रदेश : साखर उद्योगात गुंतवणूक वाढण्याची शक्यता

लखनौ : १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट-२०२३ पूर्वी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अर्थ मंत्री सुरेश खन्ना यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश सरकारच्या एका टीमने चेन्नईत रोड शो केला.
याबाबत, हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मंत्री खन्ना यांनी मुरुगप्पा ग्रुपचे व्हाईस चेअरमन एम. एम. मुरुगप्पन यांची भेट घेतली आणि गुंतवणूक प्रस्तावांवर चर्चा केली. कृषी आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुरुगप्पा समुहाने उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुरुगप्पा समूह कर्ज, विमा, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रांशिवाय साखर कारखाने, खते आणि जैविक शेतीमध्ये गुंतवणूक करू शकतो.
ट्रिव्हीट्रोन कंपनीचे व्हाईस चेअरमन ए. गणेशन यांचे प्रतिनिधी श्रीधरन यांच्यासोबतही बैठक झाली. त्यांनी आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. प्रवीण ग्रुपचे सीएमडी मोहम्मद अफजल यांनी खन्ना यांची भेट घेतली आणि हॉस्पिटॅलिटी, वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here