पिलिभीत : उत्तर प्रदेशात आगामी गळीत हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. गाळप हंगाम सुरळीत पार पडावा यासाठी खबरदारी घेतली जात आहे. पिलीभीतमधील साखर कारखान्यांमध्येही गळीत हंगामाची तयारी सुरू आहे. साखर कारखान्यांमध्ये देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी बिसलपूर साखर कारखान्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
पिलिभीतमध्ये एलएच शुगर मिल, किसान को-ऑपरेटिव्ह शुगर मिल पुरणपूर, किसान को-ऑपरेटिव्ह शुगर मिल बिसलपूर, बजाज हिंदुस्तान शुगर मिल, बरखेडा यांचा गळीत हंगामात सहभाग असतो. सर्व कारखान्यांमध्ये नवीन गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी सुरू आहे. कारखान्यांत देखभाल दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे.जिल्हा ऊस अधिकारी खुशीराम यांनी बिसलपूर सहकारी साखर कारखान्याची पाहणी केली. त्यांनी कारखाना हाऊस, वायलार हाऊस, पॉवर हाऊस आदींची पाहणी केली. बिसलपूर कारखान्यात २० टक्के देखभाल दुरुस्तीचे काम झाले आहे. एलएच शुगर मिलमध्ये २५ टक्के, पुरनपूर आणि बारखेडा कारखान्यात २० टक्के काम झाले आहे. आगामी हंगामात ऊस गाळपात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी देखभाल दुरुस्तीचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे.