उत्तरप्रदेशात महाराष्ट्राच्या तुलनेत जवळपास दुप्पट साखर उत्पादन

लखनऊ: उत्तर प्रदेशचे ऊस व साखर विकास मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्रापेक्षाही पुढे गेला आहे. उत्तर प्रदेशामध्ये 12 मे पर्यंत 121 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. जे देशाच्या एकूण साखर उत्पादनाच्या 45 टक्के आहे. महाराष्ट्रात आता जवळपास 60 लाख टनापेक्षा अधिक साखर उत्पादन झाले आहे.

उत्तर प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रही साखरेच्या उत्पादनात पुढे गेला असता पण या हंगामात राज्यातील साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे. महाराष्ट्रामध्ये महापूर आणि दुष्काळामुळे साखर उत्पादनावर परिणाम झाला आहे.

उत्तर प्रदेशामध्ये लॉकडाउन असूनही ऊसाचे गाळप सुरु आहे. उत्तर प्रदेश सरकारने कोरोना संकटावेळीही गाळप थांबवले नाही. राणा यांनी सांगितले की, कोरोना संकटावेळी अशाप्रकारचे काम करणे हे अव्हानात्मक होते. उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन वाढण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे, शेतकर्‍यांकडून करण्यात आलेला विविध जातीचा ऊस .

सध्या लॉकडाउनमुळे साखर विक्री ठप्प झाली आहे आणि निर्यातही थांबली असल्यामुळे उत्तर प्रदेशात साखर उत्पादन महाराष्ट्राच्या तुलनेत दुप्पट असूनही राज्यासमोर ही साखर विकण्याचे आव्हानच आहे. साखर उत्पादन वाढल्याने गोदामांमध्ये साखरेचा स्टॉकही वाढला आहे

यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here