उत्तर प्रदेश : ०२३८ जातीचा पर्याय वापरण्यासाठी ऊस विभागातर्फे जनजागृती मोहीम

बिजनौर : जिल्ह्यात लाल सड रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा ऊस उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. वाढता खर्च आणि घटते उत्पन्न यामुळे शेतकरी ०२३८ ऊसाच्या वाणापासून निराश होत आहेत. उसाची शेते सुकत चालली आहेत. जिल्ह्यात अजूनही ०२३८ प्रजातीच्या ऊस लागवडीचे प्रमाण ८२ टक्के आहे. यापैकी ६० टक्के ऊसाची प्रजाती बदलण्याचे उद्दिष्ट ऊस विभागाचे आहे. ०२३८ प्रजातीपासून अधिक वजन येते. चांगला साखर उतारा असल्याने साखर कारखानदारांनी त्यास पसंती दिली आहे. १२० क्विंटल प्रती बिघा उत्पादन सहज काढले जाते. उसाचे उत्पादन उत्कृष्ट मिळते, तर पूर्वी इतर ऊस जाती प्रति बिघा ५० ते ६० क्विंटल उत्पादन देत असत. यावेळी रोगराईच्या पार्श्वभूमीवर ऊस विभाग जिल्ह्यातील ०२३८ या ऊस जातींपैकी ६० टक्के बदल करणार आहे. फेब्रुवारीमध्ये उसाची लागवड सुरू होईल. यावेळी इतर जातीच्या ६० टक्के ऊसाची लागवड होणार असल्याचा दावा ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. शेतकरी स्वत: इतर जातीच्या ऊसाची पेरणी करत आहेत.

उत्तर प्रदेशात २००९ मध्ये ०२३८ उसाचे वाण प्रसारीत करण्यात आले. प्रसिद्धीनंतर शेतकऱ्यांनी २०१५-१६ मध्ये युद्धपातळीवर याची लागवड सुरू केली. याचे वजन आणि उतारा चांगला आहे. यापेक्षा चांगला वाण अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही. पण आता शेतकऱ्यांनी त्यात बदल करण्याचे ठरवले आहे. जिल्हा ऊस अधिकारी प्रभू नारायण सिंह यांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांनी ०२३८ व्यतिरिक्त इतर ऊस वाणांची पेरणी केली आहे. फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या उसाच्या पेरणीत सुमारे ६० टक्के ०२३८ उसाचे वाण बदलले जाणार आहेत. ०३८ व्यतिरिक्त इतर चांगल्या उसाच्या वाणांची पेरणी केली जाईल यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जा बियाणे दिले जाणार आहे.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here