रामपूर : उत्तर प्रदेशातील विशेष खासदार/आमदार न्यायालयाने बुधवारी शहाबाद येथील साखर कारखान्यात घुसून तोडफोड केल्याचा आरोप असलेले भाजपचे माजी आमदार काशीराम दिवाकर यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवले.याबाबत जिल्हा सरकारी वकील सीमा राणा यांनी सांगितले की, शहाबाद येथील राणा साखर कारखान्याचे अध्यक्ष ओमवीर सिंग यांनी २०१२ मध्ये फिर्याद दिली होती.दिवाकर यांच्या नेतृत्वाखाली काही लोकांनी कारखान्यामध्ये घुसून तोडफोड केल्याचा आरोप केला होता.त्याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल केला होता.कारखान्याच्या आवारातून ट्रॅक्टर ट्रॉली काढण्यावरून हा वाद झाला.
या घटनवेळी जमावाने काही कामगारांवरही हल्ला करून त्यांना जखमी केले होते.राणा यांनी सांगितले की, दिवाकर यांच्यासह ३८ संशयित आरोपी आणि २०० अज्ञात लोकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.सुनावणीनंतर विशेष आमदार- खासदार न्यायालयाचे न्यायाधीश विजय कुमार यांनी दिवाकर यांच्यासह इतर पाचजण, कृष्णपाल, भरत, संजू यादव, मेघराज आणि सुरेश गुप्ता यांना दोषी ठरवले. पुराव्याअभावी न्यायालयाने अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता केली.