लखीमपूर खिरी : जमुनाबाद कृषी फार्मच्या कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. तीन दिवसांच्या शिबिरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नवीन तंत्रे, प्रगत वाणांची माहिती देण्यात आली. जिल्हा ऊस अधिकारी वेद प्रकाश सिंह आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. विश्वकर्मा यांनी दीपप्रज्वलन करून प्रशिक्षणाची सुरुवात केली. प्रशिक्षण शिबिरात प्रगतीशील शेतकरी, ऊस पर्यवेक्षक आणि साखर कारखान्यांतील कामगार सहभागी झाले होते.
हिंदूस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, डॉ. एस. के. विश्वकर्मा यांनी शेतकऱ्यांना खोडवा पिक व्यवस्थापनाबद्दल, डॉ. सतनाम सिंग यांनी उसाच्या जातींच्या योग्य निवडीबद्दल, डॉ. जियालाल गुप्ता यांनी एकात्मिक कीटक व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. शकील अहमद यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. सीडीआय जेबीगंजचे अविनाश चंद्र तिवारी यांनी सूत्रसंचालन केले. एससीडीडीआय आशुतोष मधुकर यांच्यासह ऊस विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.