उत्तर प्रदेश : साखर कारखान्यांना कॅश क्रेडिट लिमिट मंजुरी (CCL) मिळण्यासाठी कठोर सूचना

लखनौ : उत्तर प्रदेशातील आगामी गळीत हंगाम २०२४-२५ साठी उसाची देयके वेळेवर आणि सुरळीतपणे केली जातील आणि कोणतीही थकबाकी नसेल याची खात्री ऊस विभाग करीत आहे. यासाठी विभाग अनेक ठोस पावले उचलत आहे.ऊस विभागाने २०२४-२५च्या गाळप हंगामासाठी कॅश क्रेडिट लिमिट (CCL) मंजुरीसाठीचे अर्ज बँकांकडे वेळेवर पाठवण्याचे निर्देश साखर कारखानदारांना दिले आहेत. विभागाच्या म्हणण्यानुसार,गेल्या गळीत हंगामात ८६ साखर कारखान्यांना बँकांकडून सीसीएल मंजूर झाले होते आणि सीसीएलच्या मान्यतेने ऊस दराच्या पेमेंटमध्ये सुलभता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here