बदायूं : शेतकऱ्यांनी वसंत ऋतूमधील ऊस पेरणीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी साखर कारखाने प्रगत उसाच्या बियाण्यांवर अनुदान देणार आहेत. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. जिल्हा ऊस अधिकारी अशर्फी लाल यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या, लवकर पक्व होणाऱ्या ऊसाच्या जातीची लागवड करण्याचे आवाहन केले आहे. २०२५-२६ च्या वसंत ऋतू हंगामात जिल्ह्यात १०,२७० हेक्टरवर उसाची लागवड करायची आहे. लागवडीसाठी उसाच्या ५१,३५०० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे आणि ऊस विभागाने राखीव ठेवलेले बियाणे ५२,६२९२ क्विंटल आहे.
‘हिंदूस्थान’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बिसौलीतील यदु साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे राखीव ठेवल्यास, ते ८० रुपये प्रति क्विंटल दराने करारावर दिले जाईल. बियाणे उचलल्यानंतर प्रति क्विंटल २५ रुपये प्रोत्साहन रक्कम दिली जाईल असे जाहीर केले आहे. तर न्योली साखर कारखाना त्यांच्या क्षेत्रात उसाचे बियाणे राखून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना करारावर प्रति क्विंटल २०० रुपये आणि ऊस पेरणीवर प्रति क्विंटल २५ रुपये प्रोत्साहन रक्कम देईल. दुसरीकडे, संबलमधील व्हीनस माळवळी साखर कारखाना १ ते ३१ मार्चपर्यंत बियाणे राखीव ठेवण्यासाठी कारखाना क्षेत्रातील बियाणेधारकांना प्रति क्विंटल ५० रुपये आणि ९ एप्रिल ते २० मेपर्यंत बियाणे वितरणासाठी प्रति क्विंटल ७५ रुपये प्रोत्साहन रक्कम देणार आहे. शिवाय,औषधांवरही विशेष अनुदान मिळेल. जिल्हा ऊस अधिकारी अशर्फी लाल म्हणाले की, उसाच्या अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी को ११८, कोशा १३२३५, कोशा १७२३१, कोएल १४२०१, कोएल १६२०२, कोएल १५४६६, को १५०२३, कोशा १६२३३, कोशा ९२३२ इत्यादी जातींची लागवड करावी.