उत्तर प्रदेश : २०२१-२२ मध्ये ११४ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये २०२१-२२ या हंगामात ११४ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याचे अनुमान आहे. आयएएएस न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडील आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी २०२०-२१ या हंगामात उत्पादीत झालेल्या ११०.६ एलएमटी साखर उत्पादनापेक्षा हे उत्पादन ४ एलएमटीने अधिक आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात ऑक्टोबर २०२१च्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हंगाम सुरू होण्यात काही दिवसांचा उशीर झाला आहे. हंगामात सध्या ७४ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. त्यांनी १५ नोव्हेंबर २०२१ अखेर २.८८ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७६ कारखाने सुरू होते. त्यांनी १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत ४ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here