राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस शेतीशी संबंधीत समान विषयांवर आधुनिक तसेच तांत्रिक माहिती देण्यासाठी साप्ताहिक स्वरुपात प्रत्येक शनिवारी चार वाजता फेसबुक लाईव्हच्या कार्यक्रमाचे आयोजन उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेच्यावतीने करण्यात येते.
उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेचे संचालक डॉ. एस. के. शुक्ल यांनी सांगितले की, या सप्ताहात आगामी २० मे रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात राज्याचे साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी राज्यातील ऊस उत्पादकांशी संवाद साधतील. कार्यक्रमादरम्यान, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण कामाबाबत भुसरेड्डी यांच्याशी विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेचे संचालक डॉ. शुक्ला म्हणाले, सद्यस्थितीत ऊस विकास विभाग पूर्णपणे डिजिटल झाला आहे. तसेच राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी स्मार्ट ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या श्रेणीत आला आहे. आज, राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी घरबसल्या मोबाईलवर सर्व्हे-ऊस नोंदणी विषयक सर्व माहिती मिळवू शकतो. ई-गन्ना ॲपच्या माध्यमातून तथा कृषी गुंतवणूकदारांना ऑनलाइन माहिती कृषी निवेश ॲपवर दिली जात आहे. ऊस कारखान्यांकडे पाठविण्यासाठी डिजिटल सप्लाय तिकीटही एसएमएसच्या माध्यमातून दिले जात आहे.
संचालक म्हणाले की, या सर्वामागे राज्याचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांची दूरदृष्टी आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्याला आज लाभ मिळत आहे. ते म्हणाले की, हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम पुढील शनिवारी २० मे २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता ऊस आयुक्त कार्यालय, लखनौ येथून प्रसारित केला जाईल. संचालक डॉ. शुल्क यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला लाभ घेण्याचे आवाहन केले. ऊस विकास विकास तसेच उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेच्या फेसबुक तथा युट्यूब चॅनलवरून या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाईल.