लखनौ :उत्तर प्रदेश सरकारचा ऊस विभाग येत्या हंगामाच्या तयारीत व्यस्त असून, त्याचवेळी उत्तर प्रदेशात गावपातळीवर सर्वेक्षण आणि नोंदणी प्रात्यक्षिकांचे काम सुरू आहे. ऊस विभागाच्यावतीने गावपातळीवरील सर्वेक्षण व नोंदणी प्रात्यक्षिकाचा अंतिम टप्पा सुरू आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या आक्षेपांचे वेळेत निराकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत २०,४८३ गावांमध्ये सर्वेक्षण आणि नोंदणी प्रात्यक्षिके पूर्ण झाली आहेत.
गळीत हंगामात सुरळीत आणि अखंडित ऊस पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी ऊस विभागाने डेटा अपडेट करण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. साखर कारखान्यांचा नवा गळीत हंगाम सुरू होण्यास अजून काही महिन्यांचा अवधी आहे, मात्र काही गुऱ्हाळघरांमध्ये उसाचे गाळप सुरू झाले आहे.