उत्तर प्रदेश: यंदाच्या हंगामात साखरेपेक्षा अधिक इथेनॉल निर्मिती करणार

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये यंदा २८ ऑक्टोबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू होत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्यांपासून याची सुरुवात होईल. २८ ऑक्टोबर रोजी मुजफ्फरनगरचा खाईखेडा, बिजनौरचा अफजलगढ, धामपूर, बरकातपूर आणि कुंदकी कारखान्याचे गाळप सुरू होईल. त्यानंतर ३० रोजी मेरठमधील दौराला कारखाना सुरू होणार आहे.

लाइव्ह हिंदुस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्याच्या ऊस विकास तथा साखर उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, यावेळी इथेनॉल तयार करण्यासाठी रसाचा, मोलॅसीसचा अधिक वापर केला जाईल. त्यामुळे साखरेचे उत्पादन कमी प्रमाणात होणार आहे. राज्यातील धामपूर, द्वारिकेश, मेजापूर, फरीदपुर आणि बरकातपूर या कारखान्यात यंदा उसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादन होणार आहे. तर उर्वरीत ७१ कारखान्यांमध्ये बी.हेवी मोलॅसीसपासून इथेनॉल उत्पादन होईल. आता एक महिना उशीरा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे राज्यातील १२० कारखान्यांच्या गळीतास गती देण्यात येईल. गेल्यावेळच्या गळीत हंगामातील ९२ टक्के ऊस बिले देण्यात आली आहेत, असे अप्पर मुख्य सचिव भुसरेड्डी यांनी यावेळी सांगितले. सहकारी तसेच साखर महामंडळाच्या कारखान्यांमध्ये साखर साठवणुकीसाठी यावेळी पाच गोदामांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये अमरोहातील गजरौला, सहारनपुरमधील ननौता, लखीमपुरमधील बेलरायां, फारूखाबादमधील कायमगंज आणि शाहजहांपुरमधील तिलहरचा समावेश आहे. उत्तर प्रदेश सहकारी साखर संघ आणि उत्तर प्रदेश राज्य साखर महामंडळाचे कार्यकारी संचालक रमाकांत पाण्डेय यांनी सांगितले की, राज्यातील २४ सहकारी आणि तीन खासगी कारखान्यांचे गाळपही लवकरच सुरू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here