लखनौ (उत्तरप्रदेश) १९ मार्च : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यात उत्तर प्रदेशचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. हे लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी अनेक सार्वजनिक उपयोगि योजना सुरू केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपल्या सरकारची तीन वर्षे ‘बेमिसाल ‘ झाली आहेत. मागील तीन वर्षात सरकारने शेतकर्यांसाठी कितीतरी योजना व विकास कामे केल्या आहेत . मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, स्वच्छ व पारदर्शक प्रशासन देऊन आमच्या सरकारने कष्टकरी शेतकर्यांच्या दारात योजनांचे लाभ देण्याचे काम केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्या सरकारने राज्यातील ऊस उत्पादकांच्या प्रति सदभावना व्यक्त करून सामाजिक व आर्थिक संरक्षण दिले. प्रत्येक ऊस उत्पादक जिल्ह्यात साखर कारखान्यांचा दर्जा पाहिला. आमच्या सरकारच्या काळात २९ साखर कारखाने बंद झाले आणि ११६ साखर कारखाने कार्यरत आहेत. परंतु आम्ही सर्व साखर कारखानदारांना पूर्ववत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आज परिस्थिती अशी आहे की राज्यातील साखर कारखानदार चांगले गाळप करीत आहेत. आम्हाला इथेनॉल संयंत्र बसविण्यास उद्युक्त करण्यात आले आणि नुकसानीत सुरू असलेल्या साखर कारखान्यांना आणि ऊस उत्पादकांच्या थकबाकीवर कमी दराने आर्थिक कर्ज उपलब्ध करुन दिले. ज्या कारखान्यांच्या दारावर कुलूप लावले गेले होते ते कारखाने इथेनॉल तयार करून आज स्वावलंबी बनत आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, आगामी काळात इथेनॉल उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश आघाडीचे राज्य बनेल.राज्यातील ३५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते.या जिल्ह्यांमध्ये साखर कारखाने कार्यरत आहेत.आगामी काळात इथेनॉल प्लांट बसविण्याचे काम केले जात आहे. मुख्यमंत्री म्हणाले की ऊस शेतकरी आणि साखर कारखाने हे एकमेकांचे पूरक आहेत, त्यामुळे दोघांच्या समांतर विकासासाठी सरकारने वेळोवेळी लोकहितासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.