उत्तर प्रदेश : उन्नती कंपनीकडून ऊसासाठी ड्रोन फवारणी सेवा सुरू

लखनौ : उन्नती कंपनीने उत्तर प्रदेशमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ड्रोनने किटकनाशक, औषध फवारणी सेवा सुरू केली आहे. यासाठी कंपनीने देशी ड्रोन फ्लीट हाऊससोबत करार केला आहे. शेतकरी उन्नती प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यू शॉपच्या माध्यमातून ड्रोन स्प्रे सर्व्हिससाठी ई बुकिंगही करता येईल. नॅपसॅक स्प्रेअरच्या माध्यमातून स्प्रे सर्व्हिस दिली जाते.

द हिंदू बिझनेस लाईनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उन्नतीचे सहसंस्थापक अमित सिन्हा यांनी सांगितले की, आम्ही उत्तर प्रदेशात आंबा, ऊसासारख्या पिकांसाठी ड्रोन स्प्रे सेवा सुरू केली आहे. या महिन्यात जवळपास १०,००० एकर जमिनीवर फवारणी केली जाईल अशी अपेक्षा आहे. सिन्हा यांनी सांगितले की, ड्रोन स्प्रे सेवेचा लाभ घेण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. या ड्रोन सेवेचा खर्च प्रती एकर ६५० ते १००० रुपये आहे. पिक, त्याचे ठिकाण, स्प्रेचे प्रमाण यावर हा दर अवलंबून आहे. ड्रोन स्प्रेमध्ये ॲग्रोकेमिकल्सची किंमत सहभागी नाही. यू शॉप्सकडे स्प्रे कंपन्यांना पुरवण्यासाठी ड्रोन असल्याने अधिक चांगली सुविधा मिळेल.

गेल्या आर्थिक वर्षात उन्नत्तीने आपल्या सेवांचा खूप विस्तार केला आहे. गेल्या वर्षी तीन लाखांच्या तुलनेत उन्नत्ती आठ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. यु रिटेलरची संख्या गेल्या एका वर्षात सहा हजारांवरून ४५ हजार झाली आहे. आमचा जीएमव्ही रनरेट वर्षभरात चार पट वाढून सुमारे ६०० कोटी रुपयांपर्यंत गेला आहे असे सिन्हा यांनी सांगितले. उन्नत्ती कंपनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, बिहार आणि राजस्थानमध्ये कार्यरत आहे. उन्नत्ती कंपनी यावर्षी चारपट प्रगतीवर लक्ष केंद्रीत करीत आहे. आणि कंपनीने २४००-२५०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट ठेवले आहे. सिन्हा म्हणाले की, कर्नाटक, तेलंगणा, यूपी, पंजाबमध्ये या वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनी व्यापक प्रमाणात कामकाज सुरू करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here