लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गळीत हंगामात थेट उसापासून इथेनॉल उत्पादन सुरू होणार आहे. पेट्रोलसह मिश्रण करण्यासाठी उपयुक्त इथेनॉलचे उत्पादन सार्वजनिक क्षेत्रातील पिपराईच साखर कारखाना गोरखपूर आणि बलरामपूर साखर कारखान्यात केले जाईल. सरकारने गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात उसापासून इथेनॉल निर्मितीचा निर्णय घेतला होता. पिपराईच साखर कारखान्यात याचा एक पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला होता.
उत्तर प्रदेश देशातील प्रमुख इथेनॉल उत्पादक राज्य आहे. पेट्रोलसोबत मिश्रणासाठी इथेनॉलचा वापर साखर उद्योगाला अधिक महसूल आणि शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यास मदत करेल. राज्यात इथेनॉलचे उत्पादन करणारी ५३ डिस्टिलरी आहेत. त्यांची वार्षिक क्षमता १५८.४४ कोटी लिटर आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये यूपीत ४२.७० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्यात आले. तर २०२०-२१ मध्ये ते वाढून ९९.३१ कोटी लिटर झाले आहे. युपीत ७२ डिस्टीलरी आहेत. त्यातील ४७ साखर कारखान्यांशी जोडली गेली आहेत.
साखर उद्योग मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, आगामी गळीत हंगाम २०२१-२२ साठी उसाच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना ४००० कोटी रुपये अतिरिक्त मिळतील. साखर कारखान्यांनी २०१९-२०चे शंभर टक्के पैसे दिले आहेत. गेल्या हंगामातील ८५ टक्के पैसे देण्यात आले आहेत. २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांना ३३,०१४ कोटी रुपयांपैकी २८,०१५ कोटी रुपये कारखान्यांनी दिले आहेत असे राणा म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link