लखनौ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली तसेच साखर उद्योग आणि ऊस विकास मंत्री सुरेश राणा यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास विभागाने शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी प्रयत्न केले. परिणामी २०१९-२० या वर्षातील शंभर टक्के ऊस बिले शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहेत.
याबाबतची माहिती देताना ऊस तथा साखर आयुक्त संजय भूसरेड्डी यांनी सांगितले की, साखर उद्योग आणि ऊस विकास विभागाने कोरोना महामारीच्या देशव्यापी संकटकाळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचे रक्षण केले आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी २०१९-२० या हंगामात देय असलेल्या ३५,८९८.८५ कोटी रुपये ऊस बिलांपैकी १०० टक्के पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. तर २०२०-२१ या गळीत हंगामात शेतकऱ्यांना ६३ टक्के ऊस बिले मिळाली आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटीबद्ध आहे. गेल्या हंगामातील आणि आताचे असे एकूण १,३५,१११ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.
ऊस बिलांचा नियमित आढावा
ऊस विभागाच्या आयुक्तांकडून ऊसच्या बिलांचा नियमित आढावा घेतला जात आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांकडून साखर कारखान्यांवर दबाव वाढविण्यात आला आहे. शेतकऱ्यांची ऊस बिले देण्यात गती आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबत कृशी विभागाच्या कर्मचाऱ्यांना कोरोना महामारीपासून काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.