उत्तराखंड: थकीत ऊस बिलांप्रश्नी आप करणार आंदोलन

हरिद्वार : आम आदमी पक्षाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकारविरोधात धरणे आंदोलन करण्याची रणनीती तयार केली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, थकीत ऊस बिले तातडीने दिली जावीत यासाठी लवकरच आंदोलन केले जाईल. गुरुवारी याबाबत कार्यकर्त्यांची एक बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेश शर्मा यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, अशी घोषणा केली होती. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नसून त्यांना उत्पादन खर्चही मिळणे मुश्किल झाले आहे. उत्तराखंड या ऊर्जेच्या प्रदेशात आज विज अत्यंत महागडी आहे. खते, बियाणे, पेट्रोल-डिझेल प्रत्येक गोष्टीचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नसून त्यांची कर्जे एनपीएमध्ये गेली आहेत. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर आले आहेत. जर सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत, तर आम आदमी पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.

यावेळी विधानसभा अध्यक्ष संजू नारंग, संदीप कुमार, पवन धिमान, अंकुर बागडी, खलील राणा, खालिद हसन, हरिश्चंद्र, उस्मान मलिक, तबरेज आलम, मनोज कश्यप, फिरोज जमशेद, रवी चौहान, जाकीर हसन, आशिष गौड, रेखा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here