रुडकी : ऊस विभाग आणि लक्सर साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने ऊस शेती करण्याबाबत मार्गदर्शन केले. चांगल्या बियाण्यांच्या वापर करुन लागणीपासून तोडणीपर्यंत प्रक्रिया केल्यास उत्पादन चांगले वाढेल आणि साखर उताराही चांगला मिळेल असे सांगण्यात आले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंगळवारी लक्सर सहकारी ऊस विकास समितीचे अध्यक्ष चौधरी जितेंद्र नागर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शेतकरी समितीने कोराजन आणि फटेरा या किटकनाशकांवर २५ टक्के सू दिली आहे. कर्नाल ऊस संशोधन केंद्राचे डॉ. एस. के. पांडे यांनी विभागात ०२३८ प्रजाती जादा आहे. त्यावर लाल सड रोगाचा फैलाव होत असून शेतकऱ्यांनी त्याऐवजी १५०२३, १३२३५, ०११८, १४२०१, ९८०१४ या वाणांचा वापर करावा. त्यामुळे ०२३८ पेक्षा अधिक उत्पादन मिळेल असे सांगितले. डॉ. बी. डी. सिंह यांनी स्ट्रेंच पद्धतीची माहिती दिली. कारखान्याचे सहाय्यक सरव्यवस्थापक एस. पी. सिंह यांनी मार्गदर्शन केले. परमजित सिंह, सुखपाल, सुधीर चौधरी, राजपाल, समय सिंह, मैनपाल, जगत सिंह, नरेंद्र, मुनव्वर, अलीशान, जान इलाही, कुंवर सिंह, जितेंद्र, कालूराम, विरेंद्र सिंह आदी शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.