रुडकी : लक्सर साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये १५ एप्रिल अखेरपर्यंत खरेदी केलेल्या उसाचे पैसे सहकारी ऊस विकास समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडे पाठवले आहेत, अशी माहिती कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक एस. पी. सिंह यांनी दिली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यानंतर १६ ते ३० एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या उसाची ४३.२८ कोटी रुपयांची बिले तपासणीनंतर ऊस समित्यांकडे पाठविण्यात आली आहेत. लक्सर ऊस समितीचे प्रभारी सचिव सूरजभान सिंह यांनी ऊस बिलाचा धनादेश मिळाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हा धनादेश लवकरच ऊस समितीच्या खात्यात जमा करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातील. पुढील तीन ते चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला.