उत्तराखंड : साखर कारखान्यांना तोट्यातून बाहेर काढण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे निर्देश

डेहराडून :मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सचिवालयात ऊस विकास विभागासह पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय याचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांना सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (डीएसडीपी) मध्ये पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायाचे योगदान पुढील तीन वर्षांत तीन टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी काम करावे अशी सूचना त्यांनी केली. तसेच ऊस विकास विभागाचा आढावा घेताना मुख्यमंत्री धामी यांनी साखर कारखान्यांना तोट्यातून बाहेर काढावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री धामी म्हणाले की,अधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण, कार्यक्षमता आणि क्षमता वाढविण्याच्या दिशेने काम केले पाहिजे. राज्यातील ऊस बियाणे बदलण्याचे काम, जीपीएसद्वारे ऊस सर्वेक्षण करण्यासह राज्यातील सेंद्रिय ऊस उत्पादनाला चालना देण्याचे उद्दिष्ट लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेवर मिळतील याची काळजी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.

पशूसंवर्धन, दुग्धविकास, मत्स व्यवसाय आदी व्यवसायांतर्गत येणाऱ्या स्थानिक उत्पादनांच्या जलद प्रचारावरही त्यांनी भर दिला.पशुसंवर्धन आणि दुग्धविकास क्षेत्रात जीएसडीपी वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचा संपूर्ण कृती आराखडा तयार करून सादर करण्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्याचे निर्देश त्यांनी दिले.मंत्री सौरभ बहुगुणा यांनी पशूसंवर्धन विभागाचा आढावा घेतला. मुख्य सचिव राधा रातुरी, अपर मुख्य सचिव आनंद बर्धन, प्रधान सचिव आर. के. सुधांशू, सचिव डॉ. बी.व्ही.आर. सी. पुरुषोत्तम, विशेष सचिव डॉ. पराग मधुकर धकाते, अतिरिक्त सचिव विजय जोगदंडे, नियोजन विभागाचे मनोज पंत व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here