रुडकी : झबरेडासोबतच भक्तवली, कोतवाल-आलमपूर, सबतवाली, साधौली, खडखडी, खजुरी, देलना, कुशलपूर, मानकपूर-आदमपूर आदी गावांतील शेतकरी आपला ऊस इक्बालपूर साखर कारखाना आणि उत्तम साखर कारखान्याला पुरवतात. त्यामुळे गुळ कारखान्यांमध्ये उसाची आवक मंदावली होती. त्यामुळे गुळ उत्पादकांनी उसाच्या दरात ४०० रुपये प्रती क्विंटल अशी वाढ केली आहे.
शेतकरी राजवीर सिंग, यशवीर सिंग, रोहित कुमार, नीरज कुमार, सुलेमान मलिक आणि शमशाद अहमद आदींनी सांगितले की, जेव्हा गुऱ्हाळघरे, क्रशरमध्ये उसाचा भाव ४०० रुपये प्रती क्विंटलपेक्षा जास्त असतो, तेव्हा ते आपला माल विकतात. फक्त गुऱ्हाळघरे, क्रशरला ऊस दिल्यास फायदा होईल. गुळ क्रशरमध्ये उसाचा भाव असाच राहिला तर अनेक शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळघरांकडे पाठवू शकतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.