सितारगंज : शेतकऱ्यांच्या बैठकीत उसाचा आधारभूत दर ४०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी करण्यात आली. आगामी गळीत हंगामाबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. सहकारी ऊस विकास समितीच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहकारी ऊस विकास समिती सभागृहात सभापती चौधरी वीरेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची बैठक झाली. किच्छा साखर कारखान्याशी संलग्न केंद्रे पूर्वीप्रमाणेच किच्छा साखर कारखान्याशी जोडण्यात यावी. तिल्यापूर आणि टागोरनगर खरेदी केंद्राच्या निविदा थांबवण्यात आल्या आहेत. त्या निविदाही लवकरात लवकर काढाव्यात. शेतकऱ्यांना कर्जावर खत बियाणे उपलब्ध नाही. ते मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांना वेळेवर कर्जावर बियाणे मिळावे यासाठी उत्तराखंड ऊस विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी करण्यात आली. ऊस विकास समितीच्या सदस्यांनी आगामी गळीत हंगामासाठी ऊसाचा दर प्रती क्विंटल ४०० रुपये करण्याची मागणी केली. बैठकीत सचिव ताहिर अली यांनी समितीच्या कामकाजाचा आढावा मांडला. यावेळी ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक ऊदल सिंह, सहायक लेखाकार ब्रजेश गोविंद राव, समिती सदस्य गुरविंदर सिंह, अनिरुद्ध राय, कृपाल सिंह, शीला देवी, विमल सरदार, हरविंदर पाल सिंह, जसवीर सिंह उपस्थित होते.