उत्तराखंड : डोईवाला साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊस बिलांचा पाचवा हप्ता अदा

डेहराडून : डोईवाला साखर कारखान्याच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ७.५ कोटी रुपयांचा पाचवा हप्ता जारी करण्यात आला आहे. ३ जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीत कारखान्याला पुरवलेल्या उसाच्या देयकासाठी हा हप्ता देण्यात आला आहे. यापैकी डोईवाला सहकारी ऊस विकास समितीला ३ कोटी १९ लाख रुपये तर डेहराडून समितीला १ कोटी ८२ लाख रुपये देण्यात आले आहेत. तर रुरकी समितीला १ कोटी ४३ लाख रुपये मिळतील. ज्वालापूर समितीला ७९ लाख रुपये देण्यात आले आहेत. पांवटा व्हॅली ऊस उत्पादक समितीला २३ लाख रुपये, लक्सर समितीला ९.२६ लाख रुपये, शाकुंभरी ऊस उत्पादक समितीला २.३४ लाख रुपये देण्यात आले आहेत.

याबाबत कार्यकारी संचालक डी. पी. सिंह यांनी सांगितले की, यापूर्वी एकूण चार हप्त्यांमध्ये ३२ कोटी ७० लाख रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय, ऊस समित्या आणि ऊस विकास परिषदेला ३६.६४ लाख रुपयांचे कमिशनदेखील देण्यात आले आहे. आतापर्यंत कारखान्याने एकूण ४० कोटी २६ लाख रुपयांची ऊस बिले अदा करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी स्वच्छ, ताजा ऊस कारखान्याला पुरवावा असे आवाहन कार्यकारी संचालक सिंह यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here