रुडकी, उत्तराखंड: ऊस दराची निश्चीती न झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. ऊस दर तातडीने जाहीर करण्याची मागणी प्रदेशातील शेतकरी संघटनेने केली आहे.
याबाबत शेतकऱ्यांची प्रशासकीय भवनात बैठक झाली. ऊसाची साखर कारखान्यांकडे असेलली थकबाकी त्वरीत देण्यासह न्यूनतम समर्थन मूल्य जाहीर न झाल्याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त केली.
दर जाहीर न करता ऊस खरेदी करणे योग्य नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. या बैठकीला असोसिएशनचे प्रदेश सचिव राजेंद्र सिंह, रुडकी तहसीलचे अध्यक्ष राशिद अहमद आदी उपस्थित होते.