उत्तराखंड: राज्यातील आठ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १५५७ कोटी रुपये थकीत

काशीपूर : राज्यातील सर्व आठ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १५५७ कोटी १६ लाख ५१ हजार रुपयांची थकबाकी आहे. ऊस आयुक्त हंसा दत्त पांडे यांनी सर्व सरकारी, सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे देण्याबाबत निर्देश दिले आहेत.

ऊस आयुक्तांचे प्रशासकीय अधिकारी कमल जोशी यांनी सांगितले की, गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये सहकारी साखर कारखाना सितारगंज, बाजपूर, नादेही, कॉर्पोरेशनचे कारखाने किच्छा, डोईवाला, खाजगी साखर कारखाने इक्बालपूर, लक्सर, लिब्बरहेडी यांनी एकूण ४४३ लाख १७ हजार क्विंटल उसाचे गाळप केले आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्यांनी १११२ कोटी ३८ लाख रुपयांची बिले दिली आहेत. १२ एप्रिलअखेर शेतकऱ्यांचे कारखान्यांकडे १५५७ कोटी १६ लाख १६ हजार रुपये थकीत आहेत. त्यांनी सांगितले की, कॉर्पोरेशनचे साखर कारखाने किच्छा, डोईवाला आणि सहकारी क्षेत्रातील साखर कारखाने सितारगंज, बाजपूर आणि नादेही यांच्याकडे १११२ कोटी ३८ लाख ३९ हजार रुपये तर खासगी क्षेत्रातील कारखाने लिब्बरहेडी, लक्सर व इक्बालपूर यांच्याकडे ४४४ कोटी ७८ लाख १२ हजार रुपयांची थकबाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here