डोईवाला : डोईवाला विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने ऊस मंत्री सौरव बहुगुणा यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव मांडला. दोन वर्षांपूर्वी कारखान्याच्या पुनरुज्जीवासाठी १०८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडला गेला होता. मात्र, अद्याप एक रुपयाही मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांनी ऊस मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, सरकारने कारखान्याच्या नूतनीकरणासाठी काहीच उपाययोजना केलेली नाही. या वर्षी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालकांकडून कारखाना तोट्यातून बाहेर यावा यासाठी चांगले प्रयत्न केले गेले आहेत. त्यातून सरकारने जवळपास २० कोटी रुपये कमावले आहेत. सरकारच्या स्तरावर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी पैसे मिळण्याची गरज आहे, असे मत शेतकऱ्यांनी मांडले.
ऊस मंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात उमेद बोरा, ओमप्रकाश कांबोज, बलबीर सिंह, अशोक कुमार वर्मा, जर्नैल सिंह, दरबान बोरा, सुरेंद्र राणा आदींसह शेतकरी उपस्थित होते.