ऋषिकेश : डोईवाला साखर कारखान्याला राज्य सरकारकडून थकीत ऊस बिले देण्यासाठी अनुदानाच्या रुपात २८ कोटी २७ लाख ३४ हजार रुपये देण्यात आले आहेत. साखर कारखान्याने हे पैसे ऊस समितीच्या खात्यावर पाठवले आहेत. लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, डोईवाला साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. पी. सिंह यांनी ऊस बिले देण्यासाठी जारी करण्यात आलेल्या निधीबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, ऊस बिले देण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात देण्यात आलेला हप्ता २८ कोटी २७ लाख ३४ हजार रुपये सहकारी ऊस समितीच्या खात्यावर पाठविण्यात आला आहे. हे पैसे जमा होताच, ऊस समित्यांच्या माध्यमातून गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याने गाळप केलेल्या सर्व ऊसाची बिले शेतकऱ्यांना दिली जातील. त्याचा फायदा हजारो शेतकऱ्यांना मिळेल. यावेळी ईश्वर अग्रवाल, विशाल क्षेत्री, राजेंद्र तरियाल, सुरेंद्र राणा, करण बोहरा, नवीन चौधरी, पवन लोधी, ओमप्रकाश कंबोज, दीपक कुमार आदी उपस्थित होते.