उत्तराखंड सरकारने गळीत हंगाम २०२२-२३ साठी ऊसाच्या किमान समर्थन मूल्यामध्ये (एमएसपी) कोणतीही वाढ केलेली नाही. गेल्या वर्षीच्या दरानुसार, उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची बिले दिली जातील. सामान्य प्रजातीच्या वाणाला ३४५ रुपये आणि प्रगत प्रजातीच्या वाणाला ३५५ रुपये प्रती क्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये ऊधमसिंहनगर, हरिद्वार, नैनीताल आणि डेहराडून जिल्ह्यात ऊस शेती केली जाते. जवळपास २.५- लाख शेतकरी ८८ हजार हेक्टरमध्ये ऊस उत्पादन करतात. राज्यात ७२९.७० लाख क्विंटल ऊसाचे उत्पादन केले जाते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृ्त्तानुसार, यंदा शेतकऱ्यांना एमएसपीमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा होती. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी सरकार एमएसपी वाढ जाहीर करते. मात्र, यंदा तसे करण्यात आले नव्हते. एमएसपीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य सल्लागार समितीच्या शिफारशीच्या आधारावर कॅबिनेटने गेल्या वर्षीप्रमाणेच किमान समर्थन मूल्य लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या कारखाने प्रगत प्रजातीसाटी ३५५ रुपये प्रती क्विंटल तर सामान्य प्रजातीसाठी ३४५ रुपये प्रती क्विंटल दर देर आहेत.