डेहराडून : उत्तराखंड सरकारने सध्याच्या गळीत हंगामात उसाच्या प्रगत वाणासाठी ३५५ रुपये तर नियमित वाणासाठी ३४५ रुपये प्रती क्विंटल अशी राज्य सल्लागार किंमत (एसएपी) जाहीर केली आहे.
पत्रकार परिषदेत याची घोषणा करताना ऊस मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांनी सांगितले की, गेल्या हंगामाच्या तुलनेत चालू हंगामात उसाचा दार २९.५० रुपये प्रती क्विटंल अधिक देण्यात आला आहे. या वेळी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या हंगामाच्या तुलनेत प्रती क्विंटल २९.५० रुपये जादा मिळणार आहेत. राज्यातील प्रगत वाणांचे क्षेत्र ९५ ते ९६ टक्के इतके आहे. तर नियमित वाणाचे क्षेत्र चार ते पाच टक्के इतकेच आहे.
यादरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दीर्घकाळ बंद पडलेल्या सहकार क्षेत्रातील सितारगंज साखर कारखान्याच्या गाळप पंहामाचे उद्घाटन केले. विधिवत पूजाअर्चा करून गव्हाणीत ऊसाची मोळी टाकण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, हा सितारगंजसाठी ऐतिहासिक दिवस आहे. आज विकासाचा नवा अध्याय सुरू होत आहे. भविष्यात कारखान्यातून वीज निर्मिती आणि इथेनॉल उत्पादन केले जाईल.
धामी यांनी सांगितले की, राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना नेहमी आधुनिक आणि संपन्न बनविण्यासाठी कार्यरत आहे. आम्ही नेहमीच शेतकऱ्यांसोबत आहोत असे ते म्हणाले. सितारगंज कारखाना सुरू झाल्याचा फायदा सितारगंजसह नानकमत्ता, खटीमा येथील २५ हजार शेतकऱ्यांना होणार आहे.