रुडकी : इकबालपूर ऊस विकास परिषद व काशीपूर येथील ऊस उत्पादक शेतकरी संस्था तथा प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त पथकाच्यावतीने दरियापूर गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना पिकांवरील किड रोगांची ओळख आणि त्यांच्यापासून बचावाची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना परंपरागत शेतीऐवजी आधुनिक शेतीवर भर द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, काशीपूर ऊस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. सिद्धार्थ कश्यप यांनी ऊसाच्या नव्या प्रजाती, ऊस उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, ऊसाच्या ०२३८ प्रजातीऐवजी इतर प्रजातींची लागवड करणे, ऊस उत्पादन वाढीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर याची माहिती दिली. धनारी कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पुरुषोत्तम कुमार यांनी कीड रोगांविषयी माहिती दिली. खांडसरी निरीक्षक मोहम्मद अनिस यांनी खांडसरी धोरण २०३० ची माहिती दिली. उद्यान विभागाचे सहाय्यक विकास अधिकारी भगवानपूरचे महिला सिंह यांनी उद्यान विभागाच्या योजना, शेतकऱ्यांना दिला जाणारा लाभ याची माहिती दिली.
इकबालपूरचे ऊस विकास निरीक्षक राजीव कुमार, इफ्कोचे ओमवीर सिंह यांनीही मार्गदर्शन केले. राजेश कुमार यांनी सूत्रसंचालन केले. शेतकरी नफीस, इस्लाम, मकसूद, दिलशाद, नरेंद्र अल्ताफ आदींसह ऊस विकास विभागाचे राजेश कुमार, मोहम्मद अनीस, मनोज कुमार व चंद्रपाल सिंह आदी उपस्थित होते.