रुडकी: लिब्बरहेडी परिक्षेत्रातील विविध गावांमध्ये जावून वरिष्ठ ऊस निरीक्षक बी. के. चौधरी यांनी पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या ऊस सर्वेक्षणाची पडताळणी चौधरी यांनी केली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यावेळी सर्व ऊस पर्यवेक्षक सर्व्हे करताना दिसून आले. हे सर्वेक्षण जीपीएस टॅब्लेटच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामाची पडताळणी करण्यात आली. या कामात अधिकाधिक पारदर्शकता ठेवावी, अशा सूचना पर्यवेक्षकांना देण्यात आल्या. यावेळी शेतकऱ्यांना घोषणापत्र भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घोषणापत्र भरावे असे आवाहन यावेळी चौधरी यांनी शेतकऱ्यांना केले.