रुडकी : विभागातील ऊस गळीत हंगाम २०२२-२३ जवळपास संपुष्टात आला आहे. इक्बालपूर ऊस समितीद्वारे नव्या गळीत हंगाम २०२३-२४ साठी ऊसाची लागण, ऊस सर्व्हे आदी कामे सरू करण्यात आली आहेत. नव्या हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन घोषणापत्र जमा करण्यास सांगितले आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या काही वर्षांपासून ऊस विभाग शेतकऱ्यांना डिजिटल करण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना ऊस तोडणी पावतीचे माध्यम ऑफलाइनऐवजी ऑनलाईन करण्यात आले होते. हंगामाच्या सुरुवातीला ऑनलाइन तोडणी पावती वितरण हे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडे मोबाईल नसल्याचे सांगितले होते. शेतकऱ्यांना डिजिटल करण्यासाठी विभागाने नव्या हंगामात नवे नियम लागू केले आहेत. गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन घोषणापत्र जमा करावे लागेल.