उत्तराखंडमध्ये ऊस गळीत हंगाम लवकरच समाप्त होईल. काही साखर कारखान्यांनी हंगाम समाप्त केला आहे. आणि आता लक्सर साखर कारखान्यानेही गळीत हंगाम समाप्त करण्याची घोषणा केली आहे.
लाइव्ह हिंदूस्तानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याने नोटीस जारी करून १९ मे रोजी गळीत बंदची घोषणा केली आहे. लक्सर साखर कारखान्याने बुधवारी २-३ दिवसांत हंगाम बंद होण्याची दुसरी नोटीस दारी केली. त्यानुसार, १९ मे रोजी रात्री १२ वाजता ऊस खरेदी बंद करण्यात येणार आहे.
हरिद्वार जिल्ह्यात तीन साखर कारखाने आहेत. हे तिन्ही कारखाने खासगी क्षेत्रात आहेत. यापैकी इक्बालपुर व लिब्बरहेडी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आधीच बंद झाला आहे. तर लक्सर साखर कारखाना अद्याप ऊस खरेदी करीत आहे.